प्रतिनिधी / शिरोळ
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाऊसो चिमाजी आरगे (रा. धनगर गल्ली, धरगुत्ती, ता. शिरोळ) याच्याविरुध्द शिरोळ पोलिस गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी दिड वाजता घडली. याबाबतची फिर्याद क्लार्क सागर लक्ष्मण हेरवाडे यांनी दिली. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संशयीत आरगे हा घरफाळा भरण्यासाठी धरणगुत्ती ग्रामपंचायत येथेआला होता.
चिल्लर पैसे त्याने आणले होते ,गावातील बँकेत चिलर पैसे घेत नाहीत, असे हेरवाडे यांनी सांगितले असतानाही आरगे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.









