मुंबई/प्रतिनिधी
कोरोनाच्या दोन लाटांतून सावरलेल्या महाराष्ट्राची विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर येत आहे. राज्य सरकारने अलिकडेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते 4 थी, तर शहरी भागातील 1ली ते 7वीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. 1 डिसेंबरपासून हे वर्ग शाळेत भरणार होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
नव्या व्हेरिएंटमुळे महाराष्ट्र सरकार सावध झालं असून, आता शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता दिसत आहे. शाळा सुरू करण्याबद्दल निर्णय झालेला असला, तरी या निर्णयाबद्दल पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.