माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचा इशारा
प्रतिनिधी/मिरज
गेली दोन वर्षे कोरोना महामारीने जनता त्रासली असून, राज्य शासनाकडे कोणतेही ठोस उपाय आणि निर्णय नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. येत्या सोमवारपासून शाळा, महाविदयालये सुरु न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी राज्य सरकारला दिला.
महाराष्ट्र प्रदेश जनतादलाच्या शिष्टमंडळाने बुधवारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन राज्यातील शाळा, महाविदयालये सुरु करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी यावेळी केली.