बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकार टप्प्याटप्प्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून शाळा पुन्हा सुरू करणार आहे, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. सार्वजनिक शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणमंत्री-नियुक्त तज्ञ ’समितीच्या अहवालानुसार हा निर्णय घेतला जाणार आहे, असे ते म्हणाले.
शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी किंवा शुक्रवारी समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल. या समितीत आरोग्य विभाग, बालरोग तज्ञ, पालक संघटना, खाजगी शाळा व्यवस्थापन आणि शैक्षणिक तज्ज्ञांचे सदस्य आहेत. ज्यांनी ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याची शिफारस करण्याचा एकमताने संकल्प केला आहे, असे ते म्हणाले.
त्यांनी स्पष्ट केले की, “आठवी व त्यावरील वर्ग सुरू करण्याची शिफारस केली जात आहे.” तथापि, पालक आणि विद्यार्थी ऑनलाइन किंवा ऑफलाइन वर्ग निवडू शकतात. तसेच ही समिती पालक, अध्यापन व शिक्षकेतर कर्मचार्यांना लस देण्याचा आग्रह धरू शकते.