प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यातील बहुतांशी खासगी व जिल्हा परिषद विभागाच्या क्षेत्रात येणाया शाळा येत्या एक जुलैपासून सुरू करण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेला आहे. ज्या विभागात करोना बाबत ग्रीन झोन लागला आहे त्या क्षेत्रातील शाळा सुरु करण्यास शिक्षण विभागाने संमती दिली आहे.
दरम्यान या शाळा सुरू करण्यासाठी परिसरातील ग्रामपंचायतींनी या शाळा सुरू होण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करावे असा आदेश काढूनही सातारा शहर परिसरात असलेल्या ज्या शाळा ग्रामपंचायत हद्दीत येतात त्या शाळा व्यवस्थापनाने संबंधित ग्रामपंचायतींना लेखी पत्र देऊनही काही ग्रामपंचायतींनी या निर्जंतुकीकरण मोहिमेबाबत टाळाटाळ चालू केली आहे .केवळ दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या नुतन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभ पूर्वी सदर शाळांच्या इमारती या स्टेशन तसेच इमारतीतील फर्निचर बाजूला करून फरश्या निर्जंतुक करून घेणे शाळेचे वर्ग ,दरवाजे, त्याचे हँडल आधी निर्जंतुक करून घेणे या बाबतच्या सूचना शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनांना केल्या आहेत .मात्र लेखी पत्र देऊनही परिसरातील ग्रामपंचायती या कामासाठी दिरंगाई करत आहेत. त्यामुळे आता जाब कोणाला विचारायचा हा प्रश्न शाळा व्यवस्थापनांना पडला आहे.
वस्तुतः मनरेगाच्या अधिपत्याखाली संबंधित शाळा निर्जंतुक करणे मुलांना हात धुण्यासाठी साबण व्यवस्था तसेच मास्क याबाबतचा निधी खर्च करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. शाळांचे निर्जंतुकीकरण शाळा स्वतःच्या व्यवस्थापनाखाली दररोज करून घेतीलच मात्र शासनाकडून तसे परिपत्रक व आदेश आल्यामुळे ग्रामपंचायतींना याबाबत शाळांनी पत्र वजा विनंती करूनही ग्रामपंचायतीने मात्र दिरंगाई केल्यामुळे आता जाब कोणाला विचारायचा याबाबत नक्की काय कार्यवाही होणार असा प्रश्न शाळा व्यवस्थापन करीत आहेत.








