खानापूर तालुक्यातील सर्वेक्षण वेळेत होणे अशक्मय : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीमुळे सर्वेक्षणास विलंब होत असल्याची माहिती
प्रतिनिधी / खानापूर
जिल्हय़ात शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, सर्वेक्षण अतिशय संथगतीने होत असून वेळेत सर्वेक्षण होणे शक्मय नसल्याचे मत शिक्षण खात्याकडून व्यक्त होत आहे. ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आणि इतर कारणामुळे ग्रामीण भागात सर्वेक्षणास विलंब होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरवषी नोव्हेंबर महिन्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जाते. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वेक्षणाला विलंब झाला आहे. त्यातच शिक्षकांऐवजी ग्रामपंचायत कर्मचाऱयांवर घराघरात जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्वेक्षणाचे काम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती.
सध्या निम्म्यापेक्षा कमी सर्वेक्षण करण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानुसार दरवषी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यंदा सर्वेक्षणाची जबाबदारी पंचायतराज खात्याकडे देण्यात आली आहे आहे
जानेवारी अखेरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करुन फेब्रुवारीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती द्यावी लागणार होती. मात्र हे काम पूर्ण होण्यास आणखी 15 दिवसांचा कालावधी लागेल, असे मत व्यक्त होत आहे. सर्वेक्षण करताना मुले कोणत्या कारणास्तव शाळेत येत नाहीत, याची माहिती घेऊन त्यांच्या वयानुसार त्यांना वर्गात प्रवेश दिला जावा. अपंगत्व किंवा इतर कारणानी शाळेला येता येत नसेल तर त्या मुलाला तशी सुविधा देण्यात यावी, विद्यार्थी आजारी असेल तर तातडीने उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करावेत. तसेच विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक परिस्थितीची माहिती घ्यावी, विद्यार्थ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कुंटुबाकडील आरोग्य कार्डचा वापर करावा आदी सूचना कर्मचाऱयांना केल्या आहेत.
6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा लाभ मिळावा
सध्या सर्वेक्षणाचे 50 टक्के काम झाले आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे आवश्यक आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना किमान शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी शिक्षण खाते प्रयत्नशील आहे.