हिंडलगासह इतर शाळांना दिल्या भेटी, सॅनिटायझर-इतर स्वच्छता राखण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीमुळे मागील 9 महिन्यांपासून शाळा बंदच आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार याकडे साऱयांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मात्र, आता 1 जानेवारीपासून हायस्कूल व पदवीपूर्व महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या संरक्षणार्थ शाळांमध्ये सॅनिटायझर व इतर स्वच्छता करण्यात आली की नाही याची पाहणी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी केली.
गुरुवारी तालुक्मयातील काही शाळांना भेटी देऊन त्यांनी पाहणी केली. हिंडलगा येथे सॅनिटायझरने फवारणी करण्यास सांगितले. इतर स्वच्छता राखण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. यावेळी पीडीओ व इतर अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत. कोरोना महामारीमुळे अनेकांना याचा फटका बसला आहे. याला शाळा-कॉलेजही अपवाद नाहीत. त्यामुळे आता 1 जानेवारी 2021 पासून सरकारने शाळा सुरू करण्याचा आदेश दिला आहे. शाळा-कॉलेज सुरू होणार असल्याने शाळांची स्वच्छता आणि इतर सॅनिटायझर करण्यावर भर देण्यात आला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याची पाहणी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी करून संबंधितांना विविध सूचना केल्या आहेत.









