ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे देशात जवळपास दोन ते अडीच महिने लॉक डाऊन होता. आता काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज देखील उशिराने सुरू होणार आहेत. शालेय वर्ष सुरू झाले असले तर अजून शाळा सुरू न झाल्याने पालक व विद्यार्थी चिंतेत आहेत. या सर्वांना आता थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शाळेचा अभ्यासक्रम आणि शिकवण्याचे तास कमी करण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विट करत दिली आहे.

सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी शिक्षकांकडून आमच्यापर्यंत अनेक सूचना आल्या आहेत. त्यानंतर आम्ही येत्या शालेय वर्षात शाळांचे तास आणि अभ्यासक्रम कमी करण्याचा विचार करत आहेत, असे पोखरियाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.









