प्रतिनिधी/ बेळगाव
गणरायाच्या आगमनासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. यामुळे आपल्या लाडक्मया बाप्पाची मूर्ती बुकिंग करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. यावषी कमी उंचीच्या मूर्तींना मागणी अधिक आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा यावषी पहिले प्राधान्य हे शाडूच्या गणेशमूर्तींना दिले जात आहे. गणेश विसर्जनावेळी गर्दी न करता घरच्या घरी गणरायाची मूर्ती विसर्जित व्हावी यासाठी शाडूच्या मूर्तींना पसंती दिली जात आहे. यामुळे शाडूच्या गणेशमूर्ती करणाऱया मूर्तिकारांना चांगले दिवस आले आहेत.
प्लास्टरच्या मूर्ती विसर्जित केल्यानंतरही त्यांची विटंबना होत असल्याचे प्रकार दिसत आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून शाडूच्या गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. पर्यावरणपूरक अशा या गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. सहा इंचापासून एकवीस इंचापर्यंत या शाडूच्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. याचबरोबर काही मंडळांनीही चार ते पाच फुटाच्या शाडूच्या सार्वजनिक गणेशमूर्ती तयार करण्याच्या ऑर्डर दिल्या आहेत. यामुळे मातीच्या मूर्तींना यावेळी मागणी वाढली आहे.
शाडूच्या मूर्तींच्या किमतीत काहीशी वाढ
शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो शाडू. हा शाडू खानापूर तालुक्मयात मिळतो. यावषी लॉकडाऊनमुळे शाडूच उपलब्ध झाला नसल्याने मूर्तिकार बसून होते. नियमावलीत शिथिलता आल्यानंतर शाडू उपलब्ध झाला. त्यानंतर हळूहळू गणेशमूर्ती तयार करण्यास सुरुवात झाली. प्रशिक्षित कामगार लॉकडाऊनमुळे गावी अडकल्याने यावषी मूर्ती तयार करण्यास विलंब होत आहे. वाढलेले शाडूचे दर, मजुरी यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत काहीशी वाढ करण्यात आली आहे. परंतु काही मूर्तिकारांनी सामाजिक भान जपत यावषी किंमत वाढविणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
गोव्याला मागणी वाढली
बेळगावशेजारीच असणाऱया गोवा राज्यातून मोठय़ा प्रमाणात बेळगावच्या शाडूच्या गणेशमूर्तींना मागणी आहे. खानापूर तालुक्मयात तयार होणाऱया गणेशमूर्तींपैकी 60 टक्के गणेशमूर्ती या गोव्याला पाठविण्यात येतात. खानापूर तालुक्मयात 200 हून अधिक नोंदणीकृत मूर्तिकार आहेत. हे मूर्तिकार गोव्याबरोबरच हुबळी, बेंगळूर येथेही गणेशमूर्ती पाठवितात. गोवा राज्यात शाडूच्या गणेशमूर्तींना अनुदान दिले जात असल्यामुळे शाडूच्या गणेशमूर्ती तयार करणाऱयांना चांगले दिवस आले आहेत.
खानापूरकरांनी जपली पारंपरिक कला
सध्याच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या जमान्यातही शाडूच्या गणेशमूर्तींचे महत्त्व टिकून आहे. खानापूर तालुक्मयातील गावागावांमध्ये कुंभार समाजाने ही पारंपरिक कला आजही जपली आहे. गर्लगुंजी, शिंगिनकोप्प, निट्टूर, गणेबैल, डुक्करवाडी, विश्रांतवाडी, खानापूर, लालवाडी, नंदगड, घोटगाळी या परिसरात आजही शाडूच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात.









