बेंगळूर
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आपले पाय पसरवू पाहणाऱया शाओमी कंपनीने आपल्या 3 नव्या प्लांटमधून स्मार्टफोन, टीव्हींच्या उत्पादनात वाढ करण्याचे ठरवले आहे. भारतीय बाजारातील वाढत्या मागणीचा कल पाहून सदरचे पाऊल कंपनी उचलत आहे. उत्पादन वाढीवर कंपनी लक्ष केंद्रीत करणार असून अधिकाधिक विक्रेत्यांकडे स्मार्ट टीव्ही, फोन्सची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले. हरयाणातील बवाल येथील प्लांटमध्ये 20 टक्के उत्पादनात वाढ करण्यात आली आहे. स्मार्टफोन्सच्या विस्तारासाठी स्थानिक स्तरावर अधिक प्रयत्न केले जाणार आहेत. ओइएमएस-बीवायडी इलेक्ट्रॉनिक्स व डीबीजी टेक्नॉलॉजी यांच्याकडून कंपनी भारतात स्मार्टफोन्स बनवून घेणार आहे.









