नवी दिल्ली
वर्ष 2020 मध्ये कोरोनानंतरचे जगणे बदललेले आहे. यामध्ये बहुतांश लोक हे आपला व्यवसाय हा घरातून किंवा अन्य व्यवसाय, नोकरी करत आहेत. यात सर्वात महत्त्वाचा सहभाग हा ऑनलाईन उपकरणांचा राहिलेला आहे. यात मोबाइलसह लॅपटॉपचा वापरही अलीकडे वाढल्याचे दिसून आले आहे. शाओमी, नोकिया यांनी लॅपटॉप उत्पादनात प्रवेश केला आहे. तसेच सध्या यामध्ये ‘पोको’ ब्रँड उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. कंपनीने यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु बीआयएसवर सर्टिफिकेशनचा आधार घेत पोको येत्या वर्षात लॅपटॉप सादर करण्याची शक्यता आहे.
पोकोचे मॉडेल
यामध्ये पोको एक्स 2, पोको एम 2, पोको एम 2 प्रो, पोको सी 3 आणि पोको एक्स 3 अशी मॉडेल्स बाजारात येण्याची शक्यता आहे.









