नवी दिल्ली
स्मार्टफोन बाजारातील सॅमसंग आणि वनप्लस पाठोपाठ मजबूत स्मार्टफोन विक्रीतील कंपनी म्हणून शाओमीची कामगिरी राहिली आहे. यामध्ये शाओमी कंपनीसोबत यांच्या मी (एमआय) ब्रँडमध्येही मजबूत तेजी राहिल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. यामध्ये मागील तिमाहीत 40 हजारापर्यंतच्या किंमतीच्या फोनमध्ये ही तेजी अधिक राहिली होती. यामध्ये 20 ते 45 हजार रुपयाच्या फोन्सनी 14 ते 15 टक्क्यांपर्यंत बाजारातील वाटा काबीज केला आहे. फोन उद्योगाची सरासरी विक्री किमत ही सलगपणे वाढत राहिली आहे. 2014 ते 2015 मध्ये सुरुवात झाली होती तेव्हा विक्रीची किमत ही 6 ते 7 हजार होती. तर 2017 आणि 2019 मध्ये हा सरासरी दर साधारण 10 आणि 12 हजार झाला होता. ग्राहक जेव्हा फोनमधील डिव्हाईस बदलण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा त्यांना ईएमआयची सुविधाही प्राप्त करुन दिली जाते. यातून विक्रीत वाढ होताना दिसते.









