बीजिंग :
चीनमधील दिग्गज कंपनी शाओमीने आपल्या ‘इ’ सीरीजच्या स्मार्ट टीव्हीमधील नवीन एमआय टीव्ही इ 43 के मॉडेल जोडलेले आहे. कंपनीने याला चीनमध्येच सादर केले आहे. यामध्ये 43 इंच आकाराचा डिस्प्ले, 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज आणि शाओमीचे पॅचवॉल इंटरफेसची सुविधा दिली आहे. यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या कंटेटची देवाणघेवाण ग्राहकांना शक्मय होणार आहे. सदर टीक्हीला बेजल लेस डिझाईन आणि पूर्ण एचडी रिझोल्यूशन देण्यात आले आहे. तसेच कंपनीने अन्य स्मार्ट टीव्हीप्रमाणे यामध्ये ब्लूटय़ूथ कनेक्टिव्हीटी दिलेली नाही. या टीव्हीची किंमत 11,700 रुपये आहे.
.









