प्रतिनिधी / बेळगाव :
शांताई वृद्धाश्रमाच्यावतीने सिव्हिल हॉस्पिटलमधील अनाथ मुलांची जबाबदारी निभावण्यात येत आहे. या उपक्रमाला सिव्हिल हॉस्पिटलमधील ब्रदर्स व परिचारिकावर्गाचे मोठे सहकार्य मिळत आहे.
शांताईचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी या कार्याचा आढावा घेतला आहे. दरम्यान, अनाथ बालकांच्या सोयीसाठी सुजान मदली व आश्रमातील आजींनी बनविलेले दुपटी, कुंची, तेल व पावडर आदी साहित्य दरमहा सिव्हिलमधील बालचिकित्सा केंद्रास पुरविले जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
अनाथ बालकांसाठी कार्य करणाऱया लक्ष्मी जांगळे, सोमव्वा, बळव्वा, जयलक्ष्मी पत्तार, प्रभावती अंगडी, राजश्री बजंत्री, विद्याश्री, राधा स्वामी, सुरेश अचडाद, छाया, डॉ. शैलेश, डॉ. विजयकुमार, डॉ. चिन्मय, डॉ. ज्योती आदींचा गौरव झाला. याप्रसंगी शांताईचे संचालक संतोष ममदापुरे उपस्थित होते.









