वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
स्वीडनमध्ये शुक्रवारी रात्री उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात शेकडो लोक रस्त्यांवर उतरल्याने दंगली झाल्या आहेत. उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम धर्मग्रंथाचा अपमान केला होता, या प्रकारामुळे संतप्त लोकांनी हिंसक निदर्शने केली आहे. रस्त्यांवर टायर जाळण्यात आले असून मालम शहरातील स्थिती बिघडली आहे. सुमारे 300 लोकांनी पोलिसांवरही दगडफेक केली आहे.
उजव्या विचारसरणीच्या एका नेत्याला अटक करण्यात आल्यावर त्याच्या समर्थकांनी धर्मग्रंथ जाळला होता. मग त्याच ठिकाणी विरोधातील निदर्शनांमुळे स्थिती तणावपूर्ण झाली आहे. एका सार्वजनिक चौकात विशिष्ट धर्माच्या विरोधातील निदर्शनांदरम्यान तीन जणांनी धर्मग्रंथाचा अपमान केला होता. या घटनेनंतर दंगल पेटल्याने पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे.
डेन्मार्कच्या नेत्याला अटक
देशात प्रतिबंधित डेन्मार्कचे नेते रासमस पालुदान यांना मालम येथे सभा घेण्यास अनुमती नाकारण्यात आली होती. स्वीडनच्या सीमेवरच त्यांना रोखण्यात आले होते. रासमस यांच्या आगमनामुळे स्वीडनमधील सामाजिक शांततेला धक्का पोहोचल या भीतीने त्यांना अटक करण्यात आली होती.
धर्मग्रंथाचा अपमान
परंतु त्यांन अटक करण्यात आल्याने संतप्त झालेल्या समर्थकांनी सभेदरम्यान धर्मग्रंथाचा अपमान केला आहे. पालुदान यांनी मागील वर्षीही धर्मग्रंथाचा अपमान करत वाद निर्माण केला होता. त्यांनी अनेक द्वेषपूर्ण पोस्ट प्रसारित केल्या होत्या.









