शाहूपुरी : सातारा शहरातील शहापूर पाणी पुरवठा योजनेचे अपग्रेडेशनचे काम मंगळवार दि. 10 रोजी दुपारी 1.00 ते बुधवार दि. 11 रोजी दुपारी 1.00 या वेळेत करण्यात येणार आहे. परिणामी उपसा केंद्रातून शहरातील वितरण टाक्यांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे शहापूर योजनेचा पाणी पुरवठा मंगळवारी दुपारच्या सत्रात व बुधवारी सकाळच्या सत्रात होऊ शकणार नाही. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, पाणीपुरवठा सभापती सिता हादगे यांनी केले आहे.
Previous Articleभाजपा महिला आघाडी पूरग्रस्तांच्या मदतीला
Next Article १०० हून अधिक नर्सिंग विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह









