शहापूर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
हट्टीहोळी गल्ली, शहापूर येथील एका मटका अड्डय़ावर छापा टाकून बुकीला अटक करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली असून यासंबंधी दोघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
वैजनाथ टक्कप्पा भैकवाड (रा. कचेरी गल्ली शहापूर) असे अटक करण्यात आलेल्या मटका बुकीचे नाव आहे. त्याच्याजवळून 4450 रुपये रोखरक्कम व मटक्याच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांनी ही कारवाई केली आहे.
वैजनाथने आपण नितीन पेडणेकरकडे चिठ्ठय़ा पोहोचत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱयांना दिली असून त्यामुळे दोघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.









