संगणक, कागदपत्रे भस्मसात
प्रतिनिधी/ बेळगाव
बोळमल बोळ-शहापूर परिसरातील एका घराला शनिवारी दुपारी आग लागली. आगीत संगणक, कागदपत्रे जळाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविली. मात्र रात्री पुन्हा धूर दिसून आल्यामुळे बंब मागविण्यात आला होता.
मृत्यूंजय बोळमल यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. घरावरच त्यांचे कार्यालय आहे. मृत्यूंजय हे कर सल्लागार आहेत. तीन संगणक, फर्निचर, महत्वाची कागदपत्रे आगीत भस्मसात झाली असून शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. शॉर्टसर्किटने ही घटना घडली असावी असा संशय आहे.









