इचलकरंजी / प्रतिनिधी
शहापूर येथील विनायक हायस्कूल जवळ एका अनोळखी युवकाचा अज्ञाताने धारदार शस्त्राने निघृण खून केला. आज रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी भेट दिली.
शहापूर गावच्या भरवस्तीमध्ये खून झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इचलकरंजी शहरांमध्ये हत्यांचे सत्र सुरूच आहे. शहरांमध्ये गॅंगवॉर वाढल्याचे प्रकार गेल्या काळात दिसत आहेत. इचलकरंजी शहरालगतच्या कबनूर येथे चार दिवसापूर्वी संदीप मागाडे युवकाची धारदार शस्त्राने खून केला होती. या खुना पाठोपाठ शुक्रवारी शहापुरमध्ये एका अज्ञात युवकाचा अनोळखी मारेकऱ्यानी खून केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









