प्रतिनिधी/ बेळगाव
अळवण गल्ली, शहापूर येथील मंगाई देवीची यात्रा शुक्रवारी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावषी कोरोनामुळे ही यात्रा मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली नसली तरी भाविकांनी घरीच राहून देवीचे आशीर्वाद घेतले.
सकाळी 10 वाजता पंच कमिटीच्यावतीने गाऱहाणे उतरविण्यात आले. त्यानंतर महाआरती व पूजन करण्यात आले. यानंतर परंपरेनुसार ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. देवीला नैवेद्य दाखविण्यात आला. कोणत्याही प्रकारची गर्दी मंदिर परिसरात होऊ नये यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यात्रोत्सवावेळी ट्रस्टचे सरपंच गोविंदराव काकतकर, सचिव संजीव कागळे, उपसचिव अनिल कुरणकर, खजिनदार रविकांत हैबत्ती, संजय मुतगेकर, हिशोब तपासणीस दीपक अडकुरकर, सूरज कुडुचकर, सभाष गोरे, परशराम कदम, देवेंद्र पाटील, आप्पाजी जांगळे, सुभाष हैबत्ती, केदारी कुंभार, नागेंद्र हैबत्ती, सतीश देसाई, लक्ष्मण निकम, रमाकांत चव्हाण, पुंडलिक हंगिरगेकर यासह इतर उपस्थित होते.









