प्रतिनिधी/ बेळगाव
अळवण गल्ली, शहापूर येथील जागृती श्री मंगाई देवीचा 61 वा वाढदिवस रविवारी साजरा करण्यात आला. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात हा उत्सव साजरा होत असतो. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी सोशल डिस्टन्स तसेच नियमावलींचे पालन करण्यात आले.
ज्येष्ठ पंच आप्पाजी जांगळे यांनी यावेळी बोलताना दरवर्षी मोठय़ा उत्साहात आणि मोठय़ा प्रमाणात साजरा होणारा वाढदिवसाचा सोहळा यंदा साधेपणाने साजरा करत असल्याचे सांगितले. पंचमंडळींच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. यावेळी देवीची विशेष आरास करण्यात आली होती. संजय कागले, गोविंदराव काकतकर, बाळू कदम आदींसह अन्य उपस्थित होते.









