प्रतिनिधी/ बेळगाव
शहराला जादाचा पाणीपुरवठा करण्यासाठी हिडकल जलाशयासह 3 पंपहाऊस मधील पाणीपुरवठा करणाऱया पंपांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. याकरिता नवीन पंप बसविण्याचे काम मंगळवार दि. 3 पासून सुरू करण्यात येणार आहे. त्याकरिता शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दि. 3 पासून 5 पर्यंत 24 तास पाणीपुरवठय़ासह विविध भागातील पाणीपुरवठय़ात व्यत्यय येणार आहे.
हिडकल जलाशयामधून शहराला दररोज 12 एमजीडी पाणीपुरवठा करण्यात येतो. पण ही क्षमता वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आवश्यक ठिकाणी जलवाहिन्या बदलण्याचे काम यापूर्वी करण्यात आले आहे. तसेच हिडकल डॅम, तुमरगुद्दी आणि कुंदरगी पंपहाऊसमधील पाणीपुरवठा करणाऱया पंपांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. याकरिता विशेष पंप तयार करण्यात आले आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी दि. 3 पासून प्रारंभ करण्यात येणार आहे. याकरिता शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. तिन्ही पंपहाऊसमधील पंप बदलण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा करण्यासाठी राकसकोप जलाशयावर अवलंबून रहावे लागणार आहे. राकसकोप जलाशयामधून दररोज 12 एमजीडी पाणीपुरवठा करणे शक्मय आहे. मात्र हा पाणीसाठा संपूर्ण शहरात वितरित करण्यास अपुरा आहे. परिणामी शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजनेसह विविध भागाला पाणी टंचाईला सामोरे जावे लगण्याची शक्मयता आहे. हिडकल योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी पणीपुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा मंडळाने केले आहे.









