प्रतिनिधी / बेळगाव
सलग तिसऱया दिवशी वळीवाने बेळगाव शहर व तालुक्मयाला झोडपले. दुपारपर्यंत कडकडीत उन्हानंतर सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले. स्मार्ट सिटीअंतर्गत रस्ते व गटारींची कामे अर्धवट स्थितीत असल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
हवामानात बदल झाल्याने दोन दिवसांपासून वळीवाचा पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह रविवारी दुपारनंतर बेळगाव शहर व उपनगरांमध्ये पाऊस दाखल झाला. यामुळे व्यापारी तसेच शेतकरीवर्गाची तारांबळ उडाली. साहित्याची जमवाजमव करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. पावसाचा जोर वाढल्याने गटारी भरून वाहत होत्या. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून रस्त्यावर पडल्या होत्या.
दुपारनंतर बाजारात शुकशुकाट रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने नोकरवर्ग खरेदीसाठी बाजारात येत असतात. परंतु सध्या सुरू असलेला परिवहन कर्मचाऱयांचा संप व वळीवाचा पाऊस यामुळे दुपारनंतर बाजारात शुकशुकाट होता. यामुळे विपेत्यांचा व्यवसाय होत नसल्याने त्यांच्याकडून चिंता व्यक्त केली जात होती. रात्री मात्र गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी काही प्रमाणात गर्दी झाली होती.









