प्रतिनिधी/ बेळगाव
वीजांच्या कडकडाटासह रविवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. शहर व तालुक्मयात हा पाऊस झाला. यामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस बरसला. यामुळे विपेते, व्यापाऱयांची तारांबळ उडाली. तसेच या पावसाचा शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे.
शनिवारी रात्रीपासून वातावरणात उष्माची वाढ झाली होती. रविवारी सकाळी सुद्धा अंगाची लाही लाही होत होती. सकाळी 11 नंतर शहर व परिसरात हळू हळू पावसाच्या सरी कोसळू लागल्या. विजांच्या कडकडाटासह शहराच्या मध्यवर्ती भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे सखल भागामध्ये पाणी साचले होते. गटारींमधून पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून वाहत होते. यामुळे पावसानंतर रस्त्यावर पसरलेला गटारीमधील कचरा दिसून येत होता.
बाजारपेठेत शुकशुकाट
पावसाचे वातावरण असल्यामुळे सकाळपासुन बाजारात तुरळक गर्दी होती. नेहमी गजबजणाऱया बाजारपेठेत रविवारी मात्र शुकशुकाट होता. याचा फटका विपेते व व्यापाऱयांना बसला. दुपारनंतर पाऊस ओसरल्यानंतर काही प्रमाणात गर्दी दिसत होती. परंतु रविवार असतानाही बाजारपेठेत मात्र तुरळक गर्दी असल्याने विपेत्यांना खाली बसण्याची वेळ आली होती.
शेतकऱयांना बसला फटका
सध्या तालुक्मयाच्या पूर्व भागात सोयाबीन काढण्यात येत आहे. परंतु शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे सोयाबिन उत्पादन घेणाऱया शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. ऐन कापणीवेळी पाऊस झाल्याने सोयाबिन पूर्णपणे खराब झाले आहे. पावसामध्ये भिजलेले सोयाबिन काळे पडते व त्याला भाव अत्यंत कमी मिळतो. याचा फटका शेतकऱयांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे. याच बरोबर तालुक्मयाच्या इतर भागात बटाटे व रताळी काढली जात आहेत. त्या शेतकऱयांनाही याचा फटका बसला आहे.









