शिवज्योतींचे आगमन…शिवप्रतिमांचे पूजन!
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती उत्सवाला शनिवारी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. प्रत्येक गल्लीत, विभागांमध्ये शिवप्रतिमांचे पूजन करून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. गडकोटांवरून शिवप्रेमींनी पायी आणलेल्या शिवज्योतींचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ढोलताशांचे वादन आणि स्फूर्तिदायक पोवाड्यांच्या गायनाने वातावरण शिवमय बनले होते. यावेळी कार्यकर्त्यांसह महिला, युवती व बालचमूंचा उत्साह द्विगुणीत झाला होता.
मध्यवर्ती सार्व. शिवजयंती उत्सव मंडळ
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे परंपरेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला. महाराष्ट्रातील विविध गडकोटांवरून आणलेल्या ज्वालांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले. शिवमूर्तीसह परिसराला आकर्षकरीत्या फुलांची आरास करण्यात आली होती. ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी झाली.

धर्मवीर संभाजी चौक येथे शनिवारी पहाटेपासून शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर अॅड. अमर येळ्ळूरकर व रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते शिवाजी उद्यान येथे शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला होता.
यावेळी प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, मदन बामणे, नगरसेवक रवि साळुंखे, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणु किल्लेकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, शिवानी पाटील, माजी नगरसेवक नेताजी जाधव, गणेश द•ाrकर, राजू बिर्जे यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवजयंती चित्ररथ महामंडळ
शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शनिवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवमूर्तीला विधिवतपणे दुग्धाभिषेक व पुष्पहार अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते घालण्यात आला. यावेळी जे. बी. शहापूरकर, गिरीश पाटील, प्रमोद कंग्राळकर, किरण सांबरेकर, अरुण पाटील, प्रसाद मोरे, नितीन जाधव, विद्या पाटील, सुलोचना खन्नुकर, मिताली अनगोळकर, प्रियांका पावशे, पल्लवी ढवळे यासह इतर उपस्थित होते.
शिवयुवक मंडळ, पाटील गल्ली, वडगाव
पाटील गल्ली, वडगाव येथील शिवयुवक मंडळातर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त आकर्षक सजावट करून महिलांनी पाळणा गायिला. शिवप्रतिमेचे पूजन माजी नगरसेवक मनोहर हलगेकर व विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथून आणलेल्या ज्योतीचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ पाखरे, उपाध्यक्ष प्रसाद जुवेकर, राजू हलगेकर, संदीप भोसले, राजू पाखरे, गोपाळ हलगेकर यासह इतर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी युवक मंडळ, माळी गल्ली
माळी गल्ली येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळातर्फे शनिवारी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. नामदेव दैवकी समाजाचे अध्यक्ष अजित कोकणे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अभिजीत लंगरकांडे, भाऊराव चौगुले, प्रभाकर बामणेकर, मदन लोहार, मंजुनाथ सोनार, बसवराज नेसरगी, कपिल खटावकर, मेघन लंगरकांडे यासह इतर उपस्थित होते.
शिवजयंती उत्सव मंडळ, ताशिलदार गल्ली
ताशिलदार गल्ली येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे परंपरेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. शिवप्रतिमेचे विधिवत पूजन करून प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गजानन पाटील, उपाध्यक्ष श्रीधर चौगुले, गणेश चौगुले, गजानन जुवेकर, अनंत चौगुले, गौरांग चौगुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मराठा बँकेचे संचालक मोहन चौगुले, अनिल बाद्रे, अभिजीत जुवेकर, केदारी चऱ्हाटे, मनोहर चौगुले, मनीष चौगुले, विशाल गेंजी, अमोल मुतगेकर, विनायक चौगुले यासह शिवभक्त उपस्थित होते.
मराठा युवक संघ
गोवावेस येथील मराठा युवक संघाच्यावतीने अक्षय्य तृतीयेनिमित्त शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. शिवप्रतिमेचे पूजन संघाचे उपाध्यक्ष मारुती देवगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, नारायण किटवाडकर, शेखर हंडे, सुहास किल्लेकर व इतर सभासद उपस्थित होते.
स्वा. सावरकर युवक मंडळ, गवळी गल्ली
गवळी गल्ली, बेळगाव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर युवक मंडळातर्फे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आकर्षक सजावट करून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी भावकेश बडवाण्णाचे, अमित मोरजकर, अमर माने, आकाश गंगधर, विनायक सांबरेकर, संदीप चौगुले, अजय डोंगरे, आकाश नारब, गणेश नावेलकर, करण थापा, विशाल बडवाण्णाचे आदी उपस्थित होते.
मंगाईनगर रहिवासी संघटना, वडगाव
वडगाव येथील मंगाईनगर रहिवासी संघटनेच्यावतीने पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. येळ्ळूर येथील राजहंसगडावरून आणण्यात आलेल्या शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष बंडू केरवाडकर, श्रीधर बिर्जे, सागर पाटील, सनी रेमाण्णाचे, प्रशांत हणगोजी, अनंत गोंधळी, भालचंद्र उचगावकर, भाऊ केरवाडकर, सांगलीकर स्वामी, कुलकर्णी यासह इतर उपस्थित होते.









