प्रतिनिधी/बेळगाव
शहर परिसरात गोकुळाष्टमी आनंदाने आणि उत्साहाने साजरी करण्यात आली. त्यामुळे श्रीकृष्ण मंदिर आणि विष्णू मंदिरात आकर्षक आरास करण्यात आली होती. वडगाव येथील विष्णू मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्त सकाळी 8 वाजता भगवंतांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती करण्यात आली. मंदिरात सायंकाळी गिरीधर दास यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी भगवान श्रीकृष्णाचा जन्म यावर प्रवचन दिले. रात्री पुन्हा एकदा भगवंतांना अभिषेक घालून महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.









