प्रतिनिधी / बेळगाव
सोसाटय़ाचा वारा व पावसामुळे झालेल्या नुकसानीचा फटका शहर व तालुक्मयाला दुसऱया दिवशीही बसला. रविवारी रात्रीपर्यंत पाऊस सुरू असल्याने वीजपुरवठा ठप्प होता. पावसात काम करणे अशक्मय असल्यामुळे शहरासह ग्रामीण भाग अंधारातच होता. इलेक्ट्रॉनिक उपकरणे व मोबाईल बंद असल्याने नागरिकांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे लाईट केव्हा येईल याची वाट नागरिक पाहत होते.
रविवारी पहाटेपासून सोसाटय़ाचा वारा व पावसामुळे शहर व तालुक्मयात अनेक ठिकाणी झाडे कोसळली, तर काही ठिकाणी फांद्या पडून वीजवाहिन्यांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे वीज खांबांवर आगीच्या ठिणग्या पडल्या. ट्रान्स्फॉर्मर निकामी होऊन वीजपुरवठा ठप्प झाला. यामुळे हेस्कॉम कार्यालयात तक्रारी करण्यात येत होत्या. परंतु प्रत्येक विभागात हजारावर तक्रारी नोंद झाल्याने कर्मचारीही हतबल झाले होते. त्यामुळे हॉस्पिटल, कोविड सेंटर यांचा प्रथमतः वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
सोमवारी थोडीशी उघडीप मिळाल्याने सकाळपासूनच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक विभागवार हेस्कॉम कर्मचाऱयांना तक्रार निवारण करण्यासाठी पाठविण्यात आले होते. उपलब्ध कर्मचाऱयांवरच अधिकाऱयांना काम चालवावे लागले. नागरिकांना कार्यालयात येणे शक्मय नसल्यामुळे फोनवरूनच तक्रारी नेंद केल्या जात होत्या. रविवारपासून अंधारात असल्याने संतप्त झालेले नागरिक वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करीत होते. परंतु काही ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर निकामी झाल्यामुळे तो बदलल्याशिवाय पर्याय नसल्याने सोमवारी सायंकाळपर्यंत वाट पाहावी लागली.
वीजपुरवठा ठप्प झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी रविवारी नोंद केल्या असल्या तरी पावसामुळे दुरुस्तीचे काम धीम्या गतीने सुरू होते. सोमवारी सकाळपासून घरगुती तक्रारी निवारण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. नार्वेकर गल्ली येथील ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात आला असून, बुधवारी टीचर्स कॉलनी येथील ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
–अरविंद गदगकर (साहाय्यक कार्यकारी अभियंता-हेस्कॉम)









