
हनोई : चीनच्या शेजारच्या व्हिएतनाम देशातील डानांग या शहरात अचानकपणे कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने तेथील 80 हजार नागरिकांनी अन्य ठिकाणी पलायन केले आहे. गेले दोन दिवस हे पलायन सुरू आहे. काही कोरोनाबाधितांचे जवळचे नातेवाईकही पळाल्याने रुग्णांवर लक्ष ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्हिएतनामने आतापर्यंत कोरोनावर इतर देशांच्या तुलनेत चांगले नियंत्रण ठेवले आहे. तथापि, या देशातही आता रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे.
पाकमध्ये 2.45 लाख

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता एकंदर पावणे तीन लाखापर्यंत पोहोचली आहे. मात्र, प्रतिदिन सापडणाऱया नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र, त्या देशावर खरी आकडेवारी लपविण्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्ष संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा काही पट अधिक असल्याचा दावा आहे. यापूर्वी बऱयाच वेळेला केला आहे.








