प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात लॉक डाऊन सूरु झाल्यापासून सराफ व्यापायांनी आपली दुकाने बंद ठेवून त्यात सहभाग नोंदवला होता.मात्र, जिल्हाधिकारी यांना नुकताच काढलेल्या आदेशानुसार नेमकी दुकाने उघडायची की बंद ठेवायची याबाबत सातारा सराफ असोसिएशनने सातारा प्रांत मिनाज मुल्ला यांची भेट घेतली.त्यांनी आदेश काढल्यामुळे आता ही दुकाने काही नियम व अटीवर सुरू ठेवण्याचा आदेश त्यांनी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना दिले आहेत.त्यामुळे शहरातील सराफ दुकाने आता सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळी सुरू राहणार आहेत.
नॉन रेड झोनच्या काही नवीन अटी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केले आहेत.त्यामध्ये नेमका सराफ दुकानांचा कुठे उल्लेख दिसत नसल्याने सातारा शहरातील सराफ असोसिएशनचे पदाधिकारी यांनी सातारा प्रांत मिनाज मुल्ला यांची भेट घेतली.त्यावर चर्चा झाली.त्यानुसार दुकाने चालू ठेवण्याचे आदेश दिला आहे. नियमाचे काटेकोर पालन करावे अशी त्यांनी स्पष्ट सूचना दिलेली आहे. दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालू राहतील. दुकानांमध्ये 5 पेक्षा जास्त ग्राहक चालणार नाहीत. दुकान मालक , कामगार , ग्राहक यांच्या तोंडावर मास्क असणे बंधनकारक आहे.दुकानातील कामगारांची संख्या 30 टक्के असावी. दुकानात ग्राहकाला प्रवेश देताना ग्राहकाला सॅनिटायझर करून घेणे बंधनकारक आहे.ग्राहक करताना सोशल डिस्टन्स ठेवावे.या नियमांचे उल्लंघन झाल्यास दुकान मालकावर गुन्हा नोंद होऊ शकतो व दंडात्मक कारवाई होऊ शकते.,असे त्या आदेशात म्हटले आहे.त्यामुळे शहरातील सराफ पेढय़ा सुरू होणार आहेत.