प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात लॉकडाऊननंतर सर्व व्यवहार सुरुळीत सुरु झाले आहेत. त्या काळात शहरातील गटारावरील लोखंडी जाळय़ा गायब झाल्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले आहेत. त्याबाबतची तक्रार मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे नगरसेवक विजय काटवटे यांनी केली असून बापट यांनी त्याच अनुषंगाने अज्ञात चोरटय़ाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सुचना केल्या आहेत.
शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटरच्या चेंबरवर लोखंडी जाळी बसवलेली आहे. या जाळय़ाच गेल्या सहा ते सात महिन्यांमध्ये गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. या जाळय़ा चोरीला गेल्यामुळे गटरचे चेंबर उघडे रहात असल्याने अपघात होवू लागले आहेत. शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असून या जाळय़ा चोरीला जात आहेत. त्याच अनुषंगाने नगरसेवक विजय काटवटे यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की म्रभाग 17 मधील गटरवरील सुमारे 25 ते 30 ठिकाणच्या लोखंडी जाळय़ा चोरांनी चोरुन नेल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी चेंबरमध्ये गाडी जावून अपघात झाला व गाडय़ांच्s नुकसान झाले. अशा अपघातामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा जावू शकतो. तरी लवकरात लवकर गटरवरच्या लोखेंडी जाळय़ा बसवाव्यात.
राजवाडा बसस्थानकासमोर सुद्धा गटरवरची जाळी चोरीला गेली आहे. त्यावरती सीसीटीव्ही कॅमेरा बसवल आहे. ज्या व्यक्तीने जाळी चोरली आहे तो त्या कॅमेऱयामध्ये दिसत आहे. त्या व्यक्तीवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, व ज्या भंगार दुकानात त्या जाळय़ा विकल्या असतील, त्या भंगार दुकानावर सुद्धा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल अशा सुचना दिल्या आहेत.









