कमाल तापमान 26 अंशांवर
प्रतिनिधी/ बेळगाव
दरवषी ऑक्टोबरअखेर थंडीला सुरूवात होते. मात्र यावषी नोव्हेंबर महिन्यात देखील पाऊस पडल्याने थंडी गायब झाली हाती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून थंडीला सुरूवात झाली असून शनिवारी पारा 14 अंशांवर घसरला आहे. त्यामुळे आता थंडीमध्ये वाढ होण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.
बेळगाव शहर व तालुका परिसरात बदलणाऱया वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे. थंडीच्या दिवसात पाऊस पडल्यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र आता पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे थंडीत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. शनिवारी बेळगावचा पारा 14 अंशांवर येऊन ठेपला असून कमाल तापमान 26 अंशांवर घसरले आहे. त्यामुळे आता नागरिकांना थंडी सहन करावी लागणार आहे.
ऑक्टोबरनंतर तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण होतो. मात्र यावषी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस कोसळला. त्यामुळे थंडीही गायब झाली होती. मात्र आता थंडीला सुरूवात झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी वातावरणात अचानक बदल होताना दिसत आहे. हवामानात वारंवार बदल होत असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सर्दी, ताप, खोकला, फ्ल्यू सारख्या आजारांना नागरिकांना तेंड द्यावे लागत आहे.
थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे खरेदी करण्याकडेही वळले आहेत. त्याबरोबरच अनेक नागरिक डॉक्टरांचा सल्ला घेवून आजार बळावणार नाहीत, याची काळजी घेत आहेत. वाढत्या थंडीमुळे पहाटे फिरणाऱया वॉकर्सनाही आता आपल्या वेळेत बदल करावा लागणार आहे. आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने आता अनेक दावाखान्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.









