प्रतिनिधी/ बेळगाव
महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिव्यांग तसेच शालेय विद्यार्थी आणि दीन-दलितांना योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांनी नेहमीच सरकारकडे पाठपुरावा करून योजना मंजूर करून घेतल्या आहेत. त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या असून आता मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी शशिकला जोल्ले यांनाच महिला आणि बालकल्याण खाते द्यावे, अशी मागणी दिव्यांगांनी केली.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नावाने हे निवेदन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे देण्यात आले. पुनर्वसती केंद्रातील कर्मचाऱयांच्या वेतनात दुपटीने वाढ करण्यात आली. ग्रामीण पुनर्वसती कर्मचाऱयांचेही वेतन वाढविले आहे. त्यांनी दिव्यांगांसाठी जे काम केले आहे ते उल्लेखनीय आहे.
तळागाळातील जनतेपर्यंत योजना पोहोचविण्याचे काम केले आहे. त्या कार्यतत्पर आहेत. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडेच हे खाते द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी फकिरगौडा पाटील, किरण यलीगेर यांच्यासह दिव्यांग मोठय़ा संख्येने उपस्थित होते..









