चांगले कापड आणण्याचे कारण, एजंटाची साखळी, प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर'मधील पोस्टमार्टेम रूम (शवविच्छेदन रूम) कडे कापड उपलब्ध आहे. पण तरीही मृताच्या नातेवाईकांना बाहेरून चांगले कापड आणण्यास सांगितले जात आहे. याद्वारे मृतांच्या नातेवाईकांची लुट सुरू आहे. दोन वर्षांपुर्वीं हा प्रकार
रात्रीस खेळ चाले,’ अशा रितीने सुरू होता, गेली सप्ताहभरात हा प्रकार दिवसाही सुरू झाला आहे. येथे यामध्ये एजंटाची साखळी सक्रीय आहे. प्रशासनाने यासंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन रूम आहे. येथे तीन कर्मचारी कार्यरत आहेत. शवविच्छेदनासाठी `सीपीआर’कडून मोफत कापड पुरवले जाते. पण चांगले कापड आणा, असे नातेवाईकांना सांगितले जात आहे. त्यामुळे एखाद्याच्या अपघाती, नैसर्गिक मृत्यूनंतर शवविच्छेदन होते. त्यासाठी मोफत कापड मिळत असतानाही नातेवाईकांना बाहेरून कापड आणावयास सांगितले जात आहे.
सहा मीटर कापडासाठी नातेवाईकांना 600 ते 700 रूपये मोजावे लागत आहेत. पण यामध्ये एजंटाची साखळी असल्याची चर्चा या परिसरात आहे. यापुर्वी रात्रीच्या वेळी नातेवाईकांना असे कापड आणण्यास सांगितले जात होते. आता दिवसांही असे कापड आणावयास सांगून एक प्रकारची लुट सुरू आहे. 15 दिवसांत असा प्रकार दोनदा घडला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराची वेळीच चौकशी करावी, अशी मागणी वाढत आहे.