टॅटू काढून घेणे सध्या अत्यंत फेमस ट्रेंड ठरला आहे. अनेक लोक टॅटू काढून घेताना दिसून येतील. कुणी छंद म्हणून टॅटू काढून घेतो. तर काही जण टॅटूला स्वतःच्या भावनेशी जोडतात. सर्वसाधारपणे लोक 1-2 टॅटू काढून घेतात, परंतु काही लोकांना टॅटूचा ज्वर चढल्याने पूर्ण शरीरावरच डिझाइन करवून घेत असतात. इंग्लंडमधील एका अशाच इसमाने स्वतःच्या शरीराच्या 90 टक्के हिस्स्यावर टॅटू काढून घेतले आहेत.
शैफील्डचा रहिवासी असणाला 41 वर्षीय कारॅक स्मिथ 4 मुलांचा पिता आहे. पहिला टॅटू काढून घेताना तो केवळ 18 वर्षांचा होता. त्यानंतर एका मागोमाग एक त्याने टॅटू काढून घेतले आहेत. कारॅकने स्वतःच्या शरीराच्या 90 टक्के हिस्स्यावर टॅटू काढून घेतले असून केवळ नाक आणि गळय़ाचा भाग सोडला आहे.
टॅटू पाहून लोक इम्प्रेस

तो एक इंटरव्हेंशन वर्करप्रमाणे काम करतो आणि त्याला स्थानिक प्रशासनाने नियुक्त केले आहे. गुन्हेगारी टोळय़ांशी संपर्कात येत गुन्हे, बंदुकीच्या जगात प्रवेश करणाऱया मुलांची देखभाल करणे हे त्याचे काम आहे. टॅटूंमुळे मला एकाचवेळी 6-7 जॉब्सच्या ऑफर मिळाल्या होत्या असे कारॅकने सांगितले आहे.
मुलांना आवडतात टॅटू ज्या मुलांसोबत काम करतो, त्यांना माझे टॅटू अत्यंत पसंत पडतात असे कारॅकने म्हटले आहे. त्यांना टीव्ही शोसाठी देखील कॉल आला होता. टॅटूसाठी अनेकवेळा मला इंक मोफत मिळत होती. पूर्ण युरोपमधील कन्व्हेंशमध्ये जात होतो, तेथे टॅटू आर्टिस्ट मोफत टॅटू काढून देत होते असे तो सांगतो. त्याच्या शरीरावरील टॅटूंसाठी 41 लाख रुपयांचा खर्च आला आहे.









