वार्ताहर / खोची
आगामी गळीत हंगामामध्ये सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखाना प्रशासनाने ठेवले असून त्यासाठी शेतकरी, वाहनधारक,कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे,असे आवाहन शरद साखर कारखान्याचे चेअरमन व महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री मा.डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
नरंदे ता.हातकणंगले येथील शरद सहकारी साखर कारखान्याचा एकोणीसाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन त्यांच्या हस्ते सामाजिक अंतर राखत करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी कारखान्याचे माजी संचालक रावसो चौगुले व धनपाल भोरे यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.
चेअरमन पुढे म्हणाले, कारखान्याने सर्वच गळीत हंगाम पूर्णकार्यक्षमतेने पार पाडले आहेत. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची, तोडणी वाहतूकीची तसेच अन्य बिले वेळेवर दिली आहेत. शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास कारखान्यावर आहे. चालू वर्षीच्या हंगामासाठी ऊस गाळपाचे उत्तम नियोजन केले आहे. क्रमपाळीनुसार ऊसाची तोडणी केली जाईल. तोडणी वाहतुकीची यंत्रणा सक्षम केली आहे. पूर्णकार्यक्षमतेने हंगामात ऊसगाळपाचे उद्दीष्ट पूर्ण केले जाईल. यावेळी व्हा.चेअरमन थबा कांबळे,शिरोळ तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









