ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी आपल्या लोकतांत्रिक जनता दलाचे (थ्व्अ) लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलात (Rव्अ) विलीनीकरण केले. हे दोन्ही नेते 25 वर्षानंतर एकत्र आले आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्रिकरण ही दोन्ही पक्षांची प्राथमिकता असून, या एकजुटीचे नेतृत्त्व कोण करणार याचा विचार करू, असे शरद यादव यांनी यावेळी म्हटले आहे.
शरद यादव यांच्या दिल्लीतील घरी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यादव यांच्या नेतृत्वाखाली ही विलीनीकरणाची प्रक्रिया पार पडली. शरद यादव यांनी 2018 मध्ये जनता दल (युनायटेड) मधून पक्षाची भारतीय जनता पक्षाशी असलेली युती सोडून एलजेडीची स्थापना केली होती. केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये शरद यादव कॅबिनेट मंत्री होते. दरम्यान, योगायोगाने हे दोन्ही नेते तब्बल 25 वर्षांनी एकत्र आले आहेत. जूनमध्ये होणाऱ्या वरिष्ठ सभागृहाच्या द्विवार्षिक मतदानात शरद यादव यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्याची शक्यता आहे.









