नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकतांत्रिक जनता दलाचे (एलजेडी) प्रमुख शरद यादव यांच्या कन्या सुभाषिनी यादव यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लोकजनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी खासदार काली पांडे यांनीही काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. या दोघांनाही बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये ‘महाआघाडी’ला लढाईत पुढे नेण्याची जबाबदारी घेत आहे. शरद यादव यांनी नेहमीच महाआघाडीला समर्थन दिल्याचा दावा सुभाषिनी यांनी केला आहे. प्रकृती बरी नसल्याने शरद यादव बिहार निवडणुकीत सक्रीयपणे सहभागी होऊ शकत नसल्याचे सुभाषिनी यांनी म्हटले आहे. लोकजनशक्ती पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय काली पांडे यांनी घेतला आहे. लोकसभा सदस्य असताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना 1984 मध्ये मी समर्थन दिले होते. काँग्रेस माझे जुने घर आहे, जुन्या घरात येऊन आनंद वाटतोय असे काली पांडे यांनी म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









