वेंगुर्ले /वार्ताहर-
देशाचे माजी संरक्षण मंत्री,केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने व जिल्हा बॅंक संचालिका सौ.प्रज्ञाताई परब यांच्या सहयोगाने शाळेतील मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम पुर्ण प्राथमिक शाळा शाळा वेंगुर्ले नं. 4 मध्ये संपन्न झाला.
यावेळी महिला प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल,वेंगुर्ले शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब, जिल्हा कार्यकारणी सदस्य नितीन कुबल, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, महिला शहर अध्यक्षा सुप्रिया परब, शहर सचिव स्वप्नील रावळ, प्रदीप परब, सचिन शेटये, अमित म्हापणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.









