मुंबई \ ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दीड महिन्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. पवार-ठाकरे यांची दीड महिन्यात तिसऱ्यांदा भेट झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली यासंबंधी माहिती अद्याप समोर आलेली नाही.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथिगृहावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी कृषी संदर्भातील विविध मुद्यांचा आढावा घेतला. या बैठकीला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संदीपान भुमरे उपस्थित होते. या भेटीनंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर गेले.
दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील कृषी विषयक प्रश्नांवरुन चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यासोबतच महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील समन्वय, सध्याची राजकीय स्थिती आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक यासह इतर राजकीय मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








