नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीवर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे खासादार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडे मीडियाने राजकारणाच्या दृष्टीने पाहू नये असे संजय राऊत यांनी म्हटल आहे. संजय राऊत सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत दाखल आहेत.
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे राज्यात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी अशी नवी आघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, असा प्रश्न संजय राऊत यांना करण्यात आला. यावर राऊत यांनी म्हटलंय की, या सगळ्या बातम्या बकवास आहेत. कोणाला अशा प्रकराची स्वप्न पडत असेल तर हा एक राजकारणाचा आजार आहे. ज्यांना ही स्वप्ने पडत आहेत त्यांनी तात्काळ उपचार करावा. ठाकरे सरकार हे पाच वर्ष टीकणार असून या आघाडीला तडा जाईल असे आघाडीतील खासदारांकडून काही होणार नाही असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशातील विविध विषयावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. देशात दुसरी लाट भयानक होती यानंतर आता तिसरी लाट आली आहे. याबाबत चर्चा केली पाहिजे. देशातील लोकांसाठी अन्न, वस्त्र निवारा आणि पेट्रोल डीझलच्या दरवाढीवर चर्चा करण्यात आली पाहिजे असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Previous Articleजिल्ह्याची स्थिती जैसे थे!
Next Article कोरोना नियंत्रणासाठी `सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’








