मुंबई \ ऑनलाईन टीम
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट झाली. प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना भेटायला आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी आपलं मत माडलं आहे. शिवसेनेकडून या भेटीचं स्वागत करण्यात आलं आहे. तसंच देशहितासाठी चांगला विरोधी पर्याय आवश्यक आहे. महाविकास आघाडी शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झाली आहे, त्यामुळे शरद पवार पंतप्रधान झाले तर आनंदच होईल, असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीचं स्वागतच आहे. देशात एककल्ली कारभार सुरू आहे. देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय आवश्यक आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. राज्यात महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झाली आहे. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत म्हणाले. शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी आहे. त्यामुळे शरद पवारांनीही तो विश्वास व्यक्त केलाय. त्यांनी शिवसेनेचे कौतुक केलंय, असंही सावंत यावेळी म्हणाले.
शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी प्रशांत किशोर सकाळी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडे तीन तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित राहिले. तीन तासांच्या चर्चेत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








