मुंबई / ऑनलाईन टीम
राष्ट्रवादिचे प्रमुख शरद पवार यांच्यावर उद्या, सोमवारी ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या पित्ताशयावर ही शस्त्रक्रिया होणार आहे. पंधरा दिवसांत त्यांच्यावर होणारी ही दुसरी शस्त्रक्रिया आहे.
पंधरा दिवसापूर्वी पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यामुळे शरद पवार यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर त्यांना रूग्णालयात घरी सोडण्यात आले होते. मागच्या दोन दिवसापूर्वी रूग्णालयातून घरी परतल्यानंतर शरद पवार यांनी घरीच कोरोना लसीचा डोस घेतला होता. तसेच त्य़ांनी यावेळी लस घेण्याचे आवाहन देखील केले होते. आता त्यांच्यावर उद्या पुन्हा शस्त्रक्रिया होणार आहे.
Previous Articleदिल्ली : 25 वेळा चाकूने भोसकून घेतला पत्नीचा जीव
Next Article मध्यप्रदेशातील शहडोल, अनुपपूरमध्ये भूकंपाचे धक्के








