नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांची आज दिल्लीत भेट घेतली. केंद्रीय सहकार मंत्री म्हणून अमित शहा यांनी या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. या भेटीनंतर मात्र राजकीय वर्तुळात विविध चर्चांणा उधाण आले आहे.
शरद पवार यांनी दिल्लीत 17 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर 2 ऑगस्टला पुन्हा शरद पवार यांनी अमित शाहांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत शरद पवार आज अमित शहा यांना भेटले. संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या कार्यालयात दोघांची भेट झाली. विषय सहकाराचाच होता असं सांगितलं जातंय. याच मुद्द्यावर त्यांनी पंतप्रधानांचीही भेट घेतली होती.
Previous Articleदस्त नोंदणी प्रक्रियेतील अडचणी दूर करा- आ. वैभव नाईक
Next Article सावंतवाडीतील मुस्लिम बांधवांतर्फे पूरग्रस्तांना मदत








