प्रतिनिधी / करमाळा
मुंबई येथे आज सहयाद्री अतिथीगृहावर कुकडी प्रकल्प समूहाच्या सिंचन अडचणी व त्यावरील उपाय योजनासाठी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कुकडी प्रकल्प समूहाच्या येडगाव, वडूज, पिंपळगाव जोगे, डिंबे, माणिकडोह या प्रकल्पाच्या सिंचन अडचणी व नव्याने पाणी उपलब्ध करण्यासाठी व घाटावरील पाणी वळवून ह्या प्रकल्पामध्ये पाणी वाढ करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
तसेच डिंबे ते माणिकडोह या महत्त्वपूर्ण बोगद्याच्या कामासाठी केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिलेली आहे. राज्यातील तांत्रिक सल्लागार समितीची बैठका या विषयावरती झालेल्या आहेत. परंतु हा विषय अद्यापही प्रलंबित आहे. हा बोगदा झाल्यास पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यांना हक्काचे पाणी मिळण्यास मदत होणार आहे. या महत्वपूर्ण विषयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी मांगी तलावामध्ये जास्तीत जास्त पाणी येण्यासाठी व तेथील जास्तीत जास्त क्षेत्र सिचन खाली येण्यासाठी ज्या मागण्या केल्या. त्या मागण्यावर अभ्यास करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या व पुढील बैठकीस अभ्यास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
या बैठकीस गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, आमदार संजयमामा शिंदे, आमदार रोहित दादा पवार, आमदार अशोक बापू पवार, आमदार निलेश लंके, आमदार अतुल बेनके, जलसंपदा प्रधान सचिव विजय गौतम ,कृष्णा खोरे कार्यकारी संचालक विलास राजपूत, कुकडी मुख्य अभियंता धुमाळ आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









