प्रतिनिधी/ मुंबई
राजकारणात प्रदीर्घ कालावधी घालविल्यानंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवफत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असे म्हणत शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा केल्यानंतर सारे कार्यकर्ते अवाक् झाले. खुद्द प्रतिभा पवारही भावूक झाल्या. यानंतर कार्यकर्ते भावूक होऊन पवार यांना निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरू लागले. त्या कार्यकर्त्यांना आवरताना अजित पवार यांची मात्र दमछाक झाली. राजकारणातून निवफत्तीची घोषणा केली असली तरी पवार त्यांचा राज्यसभेचा कालावधी पूर्ण करणार आहेत. पवारांच्या निवफत्तीच्या निर्णयानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवफत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवफत्त होत असल्याची घोषणा केली.
साद घाला हजर होईन
शरद पवार म्हणाले, अध्यक्षपदावरून निवफत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवफत्ती नाही. मी सहा दशकांहून अधिक काळ जनमानसात काम करीत आलो आहे, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली अथवा कुठेही असेन पण आपणा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहीन. जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी अहोरात्र कष्ट घेत राहीन, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
सततचा प्रवास हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. आपल्या भेटीसाठी सभा, समारंभाना येत राहीन. आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपली गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आणि सरकारकडे मांडण्यासाठी माझी पायपीट अविरतपणे चालू राहील.
जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे. त्यामुळे आपणापासून कोणतीही फारकत नाही. मी आपणासोबत होतो, आहे व शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहणार! त्यामुळे भेटत राहू, असे शरद पवार यांनी नमूद केले.
भावनिक कार्यकर्ते आक्रमक, अजित पवार संतापले
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवत्ती घेत असल्याचे जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावनिक झाले. तसेच त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शरद पवारांनी हा निर्णय लगेच मागे घ्यावा. त्याशिवाय आम्ही गावाकडे परत जाणार नाही, अशी भूमिका घेतली. विशेष म्हणजे हे कार्यकर्ते थेट मंचावर जमा झाल्याने तेथे काहिसा गोंधळ उडाला. त्यामुळे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार संतप्त झाले.
मंचावर गोंधळ निर्माण झाल्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे, बसण्याचे आवाहन केले. मात्र कार्यकर्ते अजित पवारांचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते घोषणा देत होते आणि शरद पवारांनी लगेच निर्णय मागे घ्यावा, अशी आक्रमक मागणी करत होते. तेव्हा अजित पवार संतप्त झाले. सगळ्यांनी बसून घ्या. यावर शरद पवार बोलतील. तुम्ही बसून घ्या, असे त्यांनी कार्यकर्त्यांना दटावले.
अजित पवार म्हणाले, तुमच्या भावना कळल्या आहेत. आता समितीने लोकांचा कौल लक्षात घेऊन पुढील गोष्टी ठरवाव्यात. ती समिती जे ठरवेल ते शरद पवारांना मान्य आहे. माझी विनंती आहे की, समिती म्हणजे बाहेरचे लोक नाहीत. ते आपला परिवारच आहेत. तुम्ही शरद पवारांना भावनिक साद घातली आहे. ती आमच्या सर्वांच्या लक्षात आली आहे. तुम्ही काही अडचण लक्षात घ्या. ती समिती तुमच्या मनातील योग्य तो निर्णय घेईल, एवढी खात्री या निमित्ताने तुम्हाला देतो, असे अजित पवारांनी सांगितले.
शरद पवारांच्या भूमिकेला अजित पवारांचा पाठिंबा
शरद पवारांच्या निर्णयानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना अश्रू अनावर झाले. सगळ्यांनी घोषणाबाजी केली. अजित पवारांनी शरद पवारांना निर्णय मागे घेण्यास सांगावे असा हट्ट उपस्थितांनी केला. यावर अजित पवार म्हणाले, अरे वेड्यांनो तुम्ही विनंती करू शकता. मी आणि सुप्रिया बोललो तर शरद पवार आम्हाला म्हणतील बस खाली. ते आम्हाला बोलून देणार नाहीत. जयंत पाटील यांनी तर शरद पवारांनी निर्णय मागे घेतला नाही तर आपणही राजीनामा देऊ, असे जाहीर केले. त्यानंतर पक्षातील इतर नेत्यांनीही अशाच प्रकारची भूमिका घेतली असताना अजित पवारांनी मात्र शरद पवारांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. तसेच, रडणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावत असताना त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेचाही संदर्भ दिला.
सगळ्यांच्या भावना शरद पवारांनी ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत. तुम्ही गैरसमज करून घेताय. शरद पवार अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाही असे नाही. शरद पवारांच्या आत्ताच्या वयाचा विचार करता सर्वांशी चर्चा करून एका नव्या नेतफत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहातोय. ते नेतफत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम करेल, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
काळानुरूप निर्णय
उद्या साहेबांनी जेव्हा आपल्याला हाक दिली, तेव्हा आपण त्यांच्याकडे जाणारच आहोत. त्यांच्या डोळ्यांदेखत नवीन झालेला अध्यक्ष तुम्हाला का नको आहे? त्यांच्याशी चर्चा करूनच पुढचे निर्णय होणार आहेत. कुणीही भावनिक होण्याचे कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणार होता. तेच कालच जाहीर करणार होते. पण काल वज्रमूठ सभा होती. मीडियात तेच चालले असते. त्यामुळे दोन तारीख ठरली. त्यामुळे आज त्यांनी तो निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या मनात जे आहे, त्या गोष्टी आपण करू. त्याबाहेर कुणीही काहीही करणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.
पुस्तकात धक्कादायक खुलासे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती‘ या पुस्तकातून अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल, असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी त्यांनी आपण अध्यक्षपदावऊन निवफत्त होत असल्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या.









