मुंबई \ ऑनलाईन टीम
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. आता शरद पवार यांनी अमित शहा यांना पुणे भेटीचं निमंत्रण दिलं आहे. येत्या सप्टेंबरमध्ये शहा हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
या भेटीतच शरद पवार यांनी अमित शाह यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आणि अमित शाह यांची बैठक सुरू असतानाच अमित शहांनी पुण्यात येणार असल्याची माहिती पवारांना दिली. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त येणार असल्याचं शहा म्हणाले. त्यावर शरद पवारांनी शहा यांना पुण्यात आलात, तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला आवर्जून भेट देण्याची विनंती करत निमंत्रण दिलं आहे.
शरद पवारांनी गेल्याच महिन्यात 17 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर लगेच 3 ऑगस्ट रोजी अमित शहांची भेट घेतली. या पंधरा दिवसांच्या भेटीत काही लिंक असावी, अशा विविध चर्चांणा राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








