ऑनलाईन टीम / रायपूर :
शरजील इमामने देशाबाबत केलेली वक्तव्यं कन्हैय्या कुमारने देशाबाबत केलेल्या वक्तव्यांपेक्षा घातक आहेत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
छत्तीसगडच्या रायपूर येथे भाजपा कार्यरकर्ता संमेलनाला संबोधित करताना अमित शहा यांनी हे वक्तव्या केलं. ते म्हणाले, शर्जीलची भाषा ऐका. त्याचा व्हिडिओ पाहा. कन्हैय्या कुमारपेक्षाही त्याची भाषा खतरनाक आहे. चिकन नेकला कापून काढा म्हणजे आसाम आपोआप भारतापासून वेगळा होईल, असं तो या व्हिडिओत म्हणत आहे.
दरम्यान, आज दिल्ली पोलिसांनी शरजील इमामला अटक करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्यं आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली शरजील इमामला अटक केली आहे. त्याला दिल्लीत आणलं जाईल आणि तुरुंगात धाडलं जाईल.









