ऑनलाईन टीम / पुणे :
अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कार चालकावर भरधाव वेगात कार चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमलेश कामत असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. ट्रक चालक राजेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
काल दुपारी चारच्या सुमारास शबाना आझमी आणि त्यांचे पती गीतकार जावेद अख्तर यांच्या कारला खालापूर टोलनाक्याजवळ अपघात झाला. आझमी यांच्या कारचा वेग अधिक असल्याने चालकाला कार कंट्रोल करता आली नाही. भरधाव वेगातील या कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत आझमी आणि चालक कामत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.









