प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. तरीदेखील जनतेमध्ये भीतीचे वातावरण नाही. यामुळे आरोग्य विभागातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वास्तविक कोरोनापासून दक्षता घेण्यासाठी मार्गसूचीचे पालन केले पाहिजे. मात्र, प्रत्यक्षात सर्वत्रच उल्लंघन सुरू आहे. त्यामुळेच ही रुग्णसंख्या वाढत असून शनिवारीही तब्बल 1003 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी तालुक्मयामधील 272 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये शहरातील 237 जणांचा समावेश असून ग्रामीण भागातील 35 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वास्तविक शहरातील जनता जागरूक असल्याचे मानले जाते. मात्र, शहरामध्येच हे रुग्ण वाढताना दिसत आहेत. कोरोनामुळे दगावणाऱयांची संख्याही वाढत आहे. तेव्हा प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.
शनिवारी शहरातील कॅम्प, आदर्शनगर, आदर्शनगर-हिंदवाडी, आंबेडकरनगर, अमननगर, अळवण गल्ली-शहापूर, अनगोळ, आनंदवाडी, अंजनेयनगर, आझादनगर, बसव कॉलनी, गुड्सशेड रोड, गोंधळी गल्ली, हनुमाननगर, हिंदवाडी, हिंदूनगर, इंद्रप्रस्थनगर, कलमेश्वर कॉलनी, कलमेश्वरनगर-हिंडलगा, कणबर्गी, खासबाग, भाग्यनगर, भडकल गल्ली, भवानीनगर, बुडा लेआऊट, रामतीर्थनगर, शिवाजीनगर, कॅम्प, चन्नम्मानगर, चव्हाट गल्ली, चिदंबरनगर-अनगोळ, चौगुलेवाडी, गोंधळी गल्ली, श्रीनगर, रामदेव गल्ली-वडगाव, रॉय रोड, रुक्मिणीनगर, सदाशिवनगर, सहय़ाद्रीनगर, महांतेशनगर, महाद्वार रोड, मजगाव, माळी गल्ली, मंडोळी रोड, मार्कंडेयनगर, नानावाडी, नेहरुनगर, जुने गांधीनगर, शाहूनगर, शास्त्राrनगर, शिवबसवनगर, टीचर्स कॉलनी-बेळगाव, सुभाषनगर, टिळकवाडी, वैभवनगर, वीरभद्रनगर, विद्यानगर, यमनापूर या परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागातील सांबरा-एटीएस, बी. के. कंग्राळी, बाळेकुंद्री बी. के., उचगाव, गणेशपूर-हिंडलगा, गोजगा, हलगीमर्डी, हिंडलगा, हिरेबागेवाडी, काकती, कंग्राळी के. एच., करडीगुद्दी, मच्छे, पंतबाळेकुंद्री, हिरेनंदिहळ्ळी, मुतगा, शिंदोळी यासह इतर परिसरात रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आता खबरदारी घेणे गरजेचे आहे. पहिल्या लाटेपेक्षाही दुसऱया लाटेमध्ये अधिक रुग्ण आढळत आहेत. तेव्हा प्रत्येकानेच काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.









