प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी बेळगाव शहर व जिल्ह्यात कोरोनाचे 19 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रात्री जिल्हा आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमधून ही माहिती देण्यात आली आहे.
चिकोडी तालुक्यात 15 रुग्ण आढळून आले आहेत. बेळगाव तालुक्यात 2, रायबाग व सौंदत्ती तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. हे चार तालुके वगळता इतर कोणत्याही तालुक्यात नवे रुग्ण आढळून आले नाहीत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 870 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 1 लाख 842 जणांनी कोरोनावर मात केली आहे.









